बाळाराम पाटील यांच्या आमदार निधीतून शैक्षणिक साहित्याचे वाटप
माणगाव | वार्ताहर |
शेतकरी कामगार पक्षाचे नेते व कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या आमदार निधीतून माणगाव तालुक्यातील सर्व अनुदानित विद्यालयांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते व खरेदी विक्री संघ सभापती निलेश थोरे यांच्या कार्यालयात करण्यात आले.
आमदार बाळाराम पाटील शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना शैक्षणिक संस्था, मुध्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रश्नांवर कायमच लढा देत असून, शिक्षकांच्या अनेक वर्षे प्रलंबित असणार्या अनेक मागण्या व अडचणी सोडवण्याकरिता सदैव मुख्यमंत्री तसेच प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. माणगाव तालुक्यातील सगळ्याच संस्थांना पक्षीय मतभेद बाजूला ठेवून आ. बाळाराम पाटील हे येणार्या प्रत्येक अडचणीमध्ये सदैव पाठीशी राहणार असल्याचे निलेश थोरे यांनी सांगितले. केवळ माणगाव तालुकाच नव्हे, तर संपूर्ण जिल्हाभरातील अनुदानित शाळांना आमदार बाळाराम पाटील यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याचे वाटप झाले आहे.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय पंदेरे, जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य नामदेव शिंदे, मागासवर्गीय सेल तालुका अध्यक्ष संजय गायकवाड, तालुका कार्यालयीन चिटणीस राजेश कासारे, खरवली उपसरपंच स्वप्नील सकपाळ, सुरव ग्रामपंचायत माजी सरपंच सखाराम जाधव, शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि तालुक्यातील सर्व विद्यालयांचे मुख्याध्यापक/शिक्षक/कर्मचारी वृंद यांनी उपस्थित राहून आ. बाळाराम पाटील यांचे आभार मानले आहेत.