भार्जे येथे महिलांनी खेळातून लुटला आंनद

पाली/गोमाशी।वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील भार्जे येथे काळभैरव महिला मंडळ यांच्याकडून सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. त्या निमित्ताने गावातील महिलांनी खेळातून आनंद लुटला.
माजी उपसरपंच अनुसया सोनू सागळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला .महिलांसाठी हळदी कुंकू आणि विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन केले होते. यामध्ये गमतीशीर खेळ तळ्यात मळ्यात, रिंग चालवणे, फुगे फोडणे ,बादलीत बॉल टाकणे, टिकली लावणे, उखाण्याचे स्पर्धा आयोजित करून त्या खेळाचा महिलांनी मनमुरादपणे आनंद घेतला. या स्पर्धेततील विजेत्याना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
नगरसेविका गीताताई पालरेचा ,नलिनी म्हात्रे,मधुरा टाकलेकर, सभापती साक्षी दिघे यांचा काळ भैरव भार्जे महिला मंडळाकडून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी रमेश साळुंखे, रुपाली भणगे, रुचिता बेलोसे, सुनंदा देशमुख , हर्षा चांदोरकर, संगिता साखरले,विभावरी बुरुमकर,रचना जाधव,अंकिता मोरे ,भार्जे सरपंच अनुसया पवार, उपसरपंच प्रविण कालेकर प्राईन इंडिया कंपनीचे वसंत मोरे , रेखा साळुंखे, ,अंगणवाडी सेविका सुप्रिया कोंडे,आशा सेविका दिव्या कदम, प्राथमिक शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ मंडळी भार्जे मंडपडेकोरेशन ज्ञानेश्‍वर फोंडे हे उपस्थित होते. सूत्रसंचालन काटकर सर यांनी केले.

Exit mobile version