। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील पाच्छापूर येथील श्री ज्योतीरुपेश्वर देवस्थान ग्रामस्थांनी महाशिवरात्री उत्सव सोहळ्यानिमित्त जिल्हास्तरीय भव्य नृत्य स्पर्धांचे आयोजन केले होते. या नृत्य स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत स्पर्धक आणि अकॅडमी यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा विविध गटांत तसेच वैयक्तिक नृत्यप्रकारात संपन्न झाली. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.
यावेळी समूहनृत्य स्पर्धेत विश्वकला मंच उरण- प्रथम, ए.व्ही. डान्स अकॅडमी पाली- द्वितीय, हर्षाली डान्स अकॅडमी अलिबाग- तृतीय, तर डी.एफ.डान्स अकॅडमी व ओम साई डान्स अकॅडमी यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. वैयक्तिक नृत्य प्रकारातील मोठ्या गटात भार्जे येथील रितिका नरेश शिंदे- प्रथम, काव्या जठार पेण- द्वितीय, सहयोग सालवी माणगाव- तृतीय, तसेच उत्तम शीद नागोठणे व असचिता पाटील अलिबाग यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. लहान गट नृत्य प्रकारात सानवी कोटावणे पेण- प्रथम, दुर्वा जावरे अलिबाग- द्वितीय, आरोही पाटील पेण- तृतीय, रिहान नाईक रेवदंडा व मृन्मयी रावल व एंजल अन्सारी पेण यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आले.