पीएनपीत अथर्व म्हात्रे 90.50 टक्के गुण मिळवून प्रथम

????????????????????????????

आर्ट्स, सायन्सचा निकाल शंभर टक्के
। अलिबाग । प्रतिनिधी ।
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये पीएनपी एज्युकेशन सोसायटीचा आर्ट्स, कॉमर्स व सायन्स बारावीचा निकाल 99.82 टक्के लागला असून संस्थेमधून अथर्व म्हात्रे 90.50 टक्के गुण मिळवून प्रथम आलेला आहे. आर्ट्स मध्ये हिर जैन 80.17 टक्के गुण मिळवून प्रथम, अक्षया नाईक 76 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. कॉमर्स मध्ये संस्कृती पाटील 79.50 टक्के गुण मिळवून प्रथम, विशाल गिरी 76.67 टक्के गुण मिळवून द्वीतीय तर राज पाटील 76.17 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला.

तर सायन्स मध्ये अथर्व म्हात्रे 90.50 टक्के गुण मिळवून कॉलेज मध्ये आणि संस्थेत प्रथम, सई चवरकर 85 टक्के गुण मिळवून द्वीतीय तर सार्थक मोकल 84 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आ जयंत पाटील, खजिनदार नृपाल पाटील, कार्यवाह चित्रलेखा नृपाल पाटील, प्राचार्य संजय मिर्जी इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आदींकडून अभिनंदन करण्यात आले.

Exit mobile version