| अलिबाग | प्रतिनिधी |
राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्ष यांनी महाराष्ट्र सरकारच्या धर्मादाय खासगी रुग्णालय तपासणी समितीवर सांगोला विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डाॅ. भाई बाबासाहेब देशमुख यांची निवड केली आहे.
विधान मंडळाच्या ज्या काही महत्वाच्या समित्या आहेत, त्यातील पंचायत राज समिती व आता नव्याने निवड करण्यात आलेली धर्मादाय खासगी रुग्णालय तपासणी समिती आहे. राज्य सरकारने आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांची धर्मादाय खासगी रुग्णालय तपासणी समितीवर निवड केली आहे. धर्मादाय खासगी रुग्णालय तपासणी समिती ही नागरीकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा बाबतची महत्वाची समिती असून, रुग्णालयात उपचार घेत आसलेल्या रुग्णांची संपुर्ण माहीती समितीच्या माध्यमातून तपासली जाते.
आरोग्य सुविधा घेत आसलेल्या रुग्णांच्या तपासण्या व चाचण्या योग्य त्या केल्या जातात का? ते या समितीच्या माध्यमातून तपासले जाते. जे रुग्ण आर्थिक परिस्थितीने गरीब आहेत त्या रुग्णांची कागदपत्रे तपासून ते खरच गरीब आहेत का याची पडताळणी या समितीच्या माध्यमातून केली जाते. व जे रुग्ण खरोखर गरीब आहेत, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांना नियमानुसार शासकीय आरोग्य सुविधा व इतर आरोग्य विषयक शासकीय मदत मिळते का नाही ते पाहण्यासाठी चे महत्त्वपुर्ण काम या समितीचे आहे.
काही ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून अवाच्या सव्वा दवाखान्याची बिले आकारली जातात त्यामुळे नातेवाईकांना मानसिक व आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो आशा नागरीकांना रुग्णालयाची बिले योग्य त्या पध्दतीने व नियमानुसार आकारली जातात का नाही याची खातरजमा करून रुग्णांच्या नातेवाईकांना आधार देण्याचे काम या समितीच्या माध्यमातून केले जाते. आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांची राज्याच्या पंचायत राज्य समितीवर निवड झाल्या नंतर महत्वाच्या आशा धर्मादाय खासगी रुग्णालय तपासणी समितीवर निवड झाल्याची माहिती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली आहे.