ऑलिम्पिकसाठी खेळाडूने कापले बोट

| सिडनी | वृत्तसंस्था |

खेळाडूंना आपल्या खेळाप्रती असलेली जिद्द कधी कधी चाहत्यांसह सर्वांनाच आश्चर्यचकित करत असते, आणि यातच पॅरिस ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या पुरुष हॉकी संघाचा खेळाडू मॅट डॉसनने असेच काहीसे केले आहे. खेळांच्या महाकुंभात सहभागी होण्यासाठी त्याने स्वत:चे चक्क बोट कापले आहे.

ऑस्ट्रेलियन पुरुष हॉकी संघाचा 30 वर्षीय खेळाडू मॅट डॉसन तिसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार आहे. पण मॅटला अलीकडेच उजव्या हाताच्या अनामिकेला दुखापत झाली होती. त्यावेळी त्याने अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला, त्या सर्वांनी त्याला सांगितले की ते बरे होण्यासाठी सुमारे 2 आठवडे लागतील. त्यामुळे डॉसनला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळणे कठीण वाटत होते. पण मॅटला तिसरे ऑलिम्पिक खेळायचे होते आणि त्यानंतर त्याने जे केले ते आश्चर्यकारक होते. डॉक्टरांनी त्याला दोन पर्याय दिले. एक म्हणजे ऑलिम्पिक खेळू नका, दुखापत बरी होऊ द्या किंवा तुमच बोट कापून टाका. आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे मॅटने बोट कापण्याचा निर्णय घेतला.

Exit mobile version