अलिबागच्या खेळाडूंचा राज्यात डंका

मार्शल आर्टमध्ये दहा सुवर्ण, दहा रौप्य, तीन कांस्यपदकांची कमाई

| रेवदंडा | प्रतिनिधी |

नाशिक येथील मिनाताई ठाकरे क्रीडा संकुल येथे दि.1 ते 3 डिसेंबर रोजी 23 वी राज्यस्तरीय सिकाई मार्शल आर्ट अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत अलिबागच्या 14 खेळाडूंनी रायगडचे नेतृत्व करीत स्पर्धेत दहा सुवर्णपदक, दहा रौप्यपदक, तीन कांस्यपदक अशी नेत्रदीपक कामगिरी करीत अलिबागसह रायगडकारांचे नाव उंचावले.

या स्पर्धेत राज्यभरातील सर्व जिल्ह्यांचे संघांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, मुलींच्या 11 वर्षाखालील गटात आराध्य नखाते दोन रौप्यपदक, 14 वर्षांखालील गटात तमना पाटील एक सुवर्ण, एक रौप्यपदक, साना सत्यजित तुळपुळे एक सुवर्ण, एक रौप्यपदक, राधिका संतोष काभारी एक सुवर्णपदक, सृष्टी म्हामूणकर दोन रौप्यपदक, 18 वर्षाखालील गटात नम्रता गणेश चव्हाण एक रौप्य, एक कांस्यपदक प्राप्त केले.

मुलांमध्ये 11 वर्षाखालील गटात हार्दिक अकोलकर दोन सुवर्णपदक, मल्हर संदेश गुंजाळ एक सुवर्णपदक, देवदत्त मनिष पडवळ दोन रौप्यपदक, 18 वर्षांखालील गटात शिव देवजी हिलम एक सुवर्ण, एक रौप्यपदक, वरद संदीप वर्तक एक कांस्य, सिद्धार्थ अशोक पाटील एक कांस्यपदक व सिनियर गटात वेदांत संदेश सुर्वे एक सुवर्ण, एक रौप्यपदक, शुभम महेंद्र नखाते दोन सुवर्णपदक अशी नेत्रदीपक कामगिरी करीत अलिबागसह रायगडकारांचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात उंचावले.

सर्व सुवर्णपदक विजेत्यांची निवड जम्मू येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रासाठी झाली आहे. तसेच अलिबागहून प्रियंका गुजांळ, शुभम नखाते, वेदांत सुर्वे व माही खमिस यांचे राज्यस्तरीय पंच म्हणून निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक प्रियंका संदेश गुजांळ यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले. सर्व खेळाडूंचे राज्यभरातून कौतुक होत आहे.

Exit mobile version