लुटारुला विरोध केल्याने हल्ला

| पनवेल | प्रतिनिधी |

मोबाईल फोन खेचुन पळून जाणाऱ्या लुटारुला विरोध करणे पनवेलच्या तक्का भागात राहणाऱ्या एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. मोबाईल फोन खेचण्यास विरोध करणाऱ्या तरुणावर लुटारुने हॉटेलबाहेरील शेगडीवर असलेला एका मोठ्या लोखंडी चमच्याने जोरदार हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे. या हल्ल्यानंतर लुटारु मोबाईल त्याच ठिकाणी टाकून पळून गेला असून, पनवेल शहर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेत लुटारुच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव दिवेश अजय यादव (20) असे असून, तो पनवेल मधील तक्का परिसरात राहण्यास आहे. दिवेश हा तरुण तक्का परिसरातील एस.बी.आय. बँक एटीएमजवळून पायी चालत जात होता. याचवेळी हा प्रकार घडला. दिवेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी लुटारु विरोधात दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.

Exit mobile version