| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहर परिसरातील तक्का येथील एका राहत्या घरातून व परिसरातून चार मोबाईल चोरणार्या सराईत मोबाईल चोरट्यास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तक्का परिसरातील एका घरातून आरोपी ताजुउद्दीन अल्लाउद्दीन अन्सारी (24) रा.गोवंडी याने मोबाईल चोरले होते. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सपोनि प्रकाश पवार, पो.हवा.महेश पाटील, अमोल पाटील, अमोल डोईफोडे, संदेश म्हात्रे, पो.शि.विशाल दुधे, नितीन कराडे आदींचे पथक तांत्रिक तपासाद्वारे आरोपी हा गोवंडी येथे लपल्याचे निष्पन्न झाल्याने त्या ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून आतापर्यंत गुन्ह्यातील एक मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला असून इतर मोबाईलचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.