। ठाणे । प्रतिनिधी ।
ठाण्यातील वर्तकनगर येथे अडीच वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हा प्रकार शुक्रवारी (दि. 23) सकाळी घडला. वर्तकनगर येथील एमएमआरडीएच्या रेंटल इमारतीत राहणाऱ्या एका कुटुंबातील अडीच वर्षीय मुलगी घराजवळील मोकळ्या जागेत खेळत होती. दरम्यान एक अनोळखी इसम त्याठिकाणी येऊन मुलीला उचलून घेऊन जात होता. हा प्रकार मुलीच्या आईने पाहिला आणि तिने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या व्यक्तीने मुलीला तिच्या आईच्या अंगावर ढकलले आणि तेथून पळून गेला. याप्रकरणी मुलीच्या आईने वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनेने वर्तकनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.