शाळेच्या भौगोलिक विकासाकडे लक्ष

डॉ.किरण पाटील याचे प्रतिपादन

| म्हसळा । वार्ताहर ।
आजच्या जीवनात शिक्षण हे काळाची गरज आहे, त्या करिता आवश्यक साधन तितकीच महत्त्वाची आहेत. शाळा इमारत शासकीय असो अथवा खासगी असो शाळेत शैक्षणिक विकासा सोबतच शाळेचा भौगोलिक विकासाकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी म्हसळा तालुका जिजामाता शिक्षण संस्था मराठी माध्यमिक शाळा वरवठणे-आगरवाडा इमारत नूतनीकरणाचे उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

याप्रसंगी रुपेश पेलीपाडा, इब्राहीम सिद्दीकी, बी.एस.पोळ, युवराज गांगुर्डे, डॉ.प्रशांत गायकवाड, समीर बनकर, बबन मनवे, संजय खांबेटे, दिलिप कांबळे, मनोज नाक्ती, लक्ष्मण कांबळे, अ‍ॅड. मुकेश पाटिल, इरशत फकीह, रियाज फकिह, सोनल घोले, वनिता खोत, रेश्मा काणसे, निलेश मांदाडकर, प्रकाश हाके, शेखर खोत, महेश घोले, प्रदिप कदम, उदय कळस, गोविंद भायदे, कानु नाक्ती, श्री पांचाल आदी मान्यवर पदाधिकारी,विर्द्थी,शिक्षक,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version