| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुका पोलीस ठाणे अंतर्गत गुन्ह्यात जप्त केलेल्या दोन गुटखा पॅकिंग मशीनचा लिलाव करण्यात येणार आहे. या मशीनची विल्हेवाट करण्याकरिता कारवाई करण्यात येत असून, नमूद दोन गुटखा पॅकिंगच्या लिलावात भाग घेण्यास इच्छुक व्यक्तींनी आपल्या कोटेशनसह पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे तीन दिवसात संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस ठाण्याकडून करण्यात आले आहे.