ऑडी इंडियाने आकर्षक रूपातील ‘ऑडी क्यू५’ केली लॉन्च

। मुंबई । वार्ताहर ।
ऑडी या जर्मन लग्झरी कार उत्पादक कंपनीने आज आपल्या ऑडी क्यू५च्या भारतातील लाँचिंगची घोषणा केली. ऑडी क्यू५ मध्ये स्पोर्टी वैशिष्ट्ये आणि दैनंदिन वापराची योग्यता यांचा मिलाफ साधण्यात आला आहे तसेच या कारमध्ये इन्फोटेनमेंट आणि असिस्टन्सचेही अनेक पर्याय आहेत. ऑडी क्यू५ नेहमीच तिचे आकारमान, कामगिरी व उपकरणे यांच्या अचूक मिलाफासाठी प्रसिद्ध राहिली आहे. या अत्यंत यशस्वी मॉडेलच्या बाह्यरचनेला एक धारदार स्वरूप दिल्यामुळे क्यूची ओळख अधोरेखित झाली आहे आणि क्वात्रोची अंगभूत वैशिष्ट्ये त्यात सामावली गेली आहेत.

ऑडी क्यू५ मध्ये, २४९ हॉर्सपॉवर ऊर्जा व ३७० एनएम टॉर्क निर्माण करणाऱ्या २.० लिटर टीएफएसआय इंजिनची शक्ती आहे. औरंगाबादमधील एसएव्हीडब्ल्यूआयपीएल कारखान्यात तयार झालेली ऑडी क्यू५ प्रीमियम प्लस आणि टेक्नोलॉजी या दोन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असून यांची एक्स शोरूम किंमत अनुक्रमे ५८,९३,०००/- रुपये आणि ६३,७७,०००/- रुपये आहे. ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीरसिंग धिल्लन या लाँचबद्दल म्हणाले, “आज आम्ही २०२१ मधील आमचे ९वे उत्पादन बाजारात आणले आहे आणि याहून अधिक आनंदी आम्ही असूच शकत नाही. ऑडी क्यू५ अगदी पूर्वीपासून आमच्या सर्वाधिक विक्रीच्या गाड्यांपैकी एक आहे आणि हे मॉडेलही अशीच कामगिरी करेल, याबद्दल आम्हाला आत्मविश्वास आहे. अतिरिक्त सुधारणांच्या माध्यमातून ऑडी क्यू५ मध्ये लग्झरी, स्पोर्टीनेस, आराम आणि दैनंदिन वापरासाठी योग्यता यांचा अचूक संयोग साधण्यात आला आहे.” श्री. धिल्लन पुढे म्हणाले, “२०२१ हे वर्ष ऑडी इंडियासाठी उत्तम राहिले आहे. आमची विक्री वर्षाच्या पहिल्या १० महिन्यात १०० टक्क्यांहून अधिक वाढली आहे आणि ऑडी क्यू५ बाजारात आल्यामुळे ही वाढ आणखी पुढे जाईल, असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो. या वर्षाची सांगता उच्च स्तरावर करण्यासाठी आम्ही सज्ज होत आहोत आणि आणखी काही महत्त्वाची मॉडेल्स २०२२ मध्ये बाजारात आणण्यासाठीही तयारी करत आहोत.”

कामगिरी:

● २४९ हॉर्सपॉवर शक्‍ती व ३७० एनएम टॉर्क निर्माण करणाऱ्या २.० लिटर ४५ टीएफएसआय इंजिनची शक्ती ऑडी क्यू५ मध्ये आहे.

● कारचा वेग केवळ ६.३ सेकंदात शून्यावरून १०० किलोमीटरपर्यंत जातो आणि २३७ किलोमीटर प्रतितास एवढा सर्वोच्च वेग ती गाठू शकते.

● कार डॅम्पिंग नियंत्रणासह अडाप्टिव सस्पेन्शन देऊ करते.

● ऑडी ड्राइव्ह सिलेक्टच्या माध्यमातून ड्रायव्हर कंफर्ट, डायनॅमिक, इंडिव्हिज्युअल, ऑटो, एफिशिएन्सी आणि ऑफ-रोड या सहा मोड्समधून एकाची निवड करू शकतो.

● क्वात्रो फोर-व्हील ड्राइव्ह प्रणालीमुळे आव्हानात्मक भूप्रदेशांमध्ये सुयोग्य पकड मिळवण्यास मदत होते.

बाह्यरचना:

● ऑडी क्यू५ च्या पुढील बाजूला ट्रेडमार्ड सिंगलफ्रेम ग्रिल अष्टकोनी आउटलाइनसह देण्यात आली आहे, ही रचना अधिक सुस्पष्ट आहे आणि यात कडा अधिक स्पष्ट दिसून येतात.

● ग्रिल व पट्ट्यांना क्रोम गार्निशेस आहेत, तर स्किड प्लेट्स, रूफ रेल्स आणि नवीन फॉगलॅम्प केसिंगला सिल्व्हर अक्सेंट्स देण्यात आले आहेत.

● ४८.२६ सेंटीमीटर (आर१९) अलॉय व्हील्स, रॅपअराउंड शोल्डर लाइन, एलईडी कॉम्बिनेशन लॅम्प्स, पॅनोरॅमिक सनरूफ आणि अॅल्युमिनिअम रूफ नेल्स यांच्या माध्यमातून गाडीचे बाह्यरूप अधिक चांगले करण्यात आले आहे.

● ऑडी क्यू५ पुढील पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे – नॅव्हारा ब्ल्यू, आयबिस व्हाइट, मायथोस ब्लॅक, फ्लोरेट सिल्व्हर आणि मॅनहटन ग्रे.

अंतर्गत रचना:

● नवीन ऑडी क्यू५ ची अंतर्गत रचना अटलास बेज व ओकापी ब्राउन रंगातील लेदर लेदरेट अपहोल्स्ट्रीने सजली आहे, तर इनलेजचे फिनिशिंग पिआनो ब्लॅक रंगात केले आहे.

● सेन्सॉर-कंट्रोल्ड बूट लिड ऑपरेशन, पार्किंग एड प्लससह पार्क असिस्ट, ड्रायव्हर मेमरीसह पॉवर फ्रण्ट सीट्स तसेच वायरलेस चार्जिंग सुविधेसह ऑडी फोन बॉक्स यांमुळे प्रवास अत्यंत आरामदायी होईल याची निश्चिती होते.

● थ्री-झोन वातानुकूलनामुळे प्रवाशांना सुखद गारवा लाभतो आणि भवताली ३० रंगांतील समरेषीय प्रकाशयोजना असल्याने वातावरण आल्हाददायक राहते.

इन्फोटेनमेंट:

● २५.६५ सेमी मल्टिमीडिया टचस्क्रीन आणि थर्ड जनरेशन मोड्युलर इन्फोटेनमेंट प्लॅटफॉर्म एमआयबी3 गाडीच्या मध्यवर्ती स्थानी आहेत.

● स्क्रीनसोबत ऑडीचे नवीनतम एमएमआय टच, व्हॉइस कंट्रोल्स देण्यात आले आहे, हा स्क्रीन अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो यांना अनुकूल आहे. त्याचप्रमाणे सर्व नियंत्रणे एका क्लिकवर ऑपरेट होणारी आहेत.

● आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे बीअँडओ प्रीमियम साउंड सिस्टम, यामध्ये १९ स्पीकर्स असून ते ७५५ वॅट्स निष्पत्तीवर ३डी ध्वनीप्रभाव निर्माण करतात.

Exit mobile version