शिवाजी महाराजांवरील गाण्याचे ऑडिओ उद्घाटन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मा.आ.पंडित पाटील यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय कर्मचारी संघटना (विद्युत) रायगड जिल्हा अध्यक्ष संजय जाधव व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित गाण्याचे ऑडिओ उद्घाटन करण्यात आले. या गाण्यासाठी राज रमेश धुमाळ यांनी संगीत दिले आहे व रमेश जगनाथ धुमाळ यानी हे गाणं गायलं आहे. संपूर्ण गाणं राज रेकॉर्डिंग स्टुडिओ नांगरवाडी येथे बनवले आहे. ह्या गाण्याचे व्हिडिओ शूट किशोर पाटील, योगेश भोईर व गाण्याचे एडिटिंग तनय संजय जाधव यांनी केलं आहे. हे गाणं आपण राज धुमाळ ह्या यूट्यूब चॅनल वे पाहू शकता. ह्या गाण्यासाठी सहगायक म्हणून लंकेश पाटील, केतन, धुमाळ, राणी धुमाळ यांनी केलं आहे. ह्या गाण्यासाठी निर्माता म्हणून रमेश बा धुमाळ, संजय जाधव यांनी केलं आहे.

Exit mobile version