नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
रॉड लेव्हर एरिना येथे झालेल्या पुरुष एकेरीच्या तिसर्या फेरीत ग्रीसच्या चौथ्या मानांकित त्सित्सिपासने फ्रान्सच्या बेनोट पेरीवर 6-3, 7-5, 6-7 (2-7), 6-4 अशी चार सेटमध्ये मात केली. जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणार्या स्टेफानोस त्सित्सिपास आणि अरिना सबालेंका या खेळाडूंनी शनिवारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. याव्यतिरिक्त डॅनिल मेदवेदेव आणि इगा श्वीऑनटेक यांनीही तिसर्या फेरीत दमदार विजय नोंदवले.
रॉड लेव्हर एरिना येथे झालेल्या पुरुष एकेरीच्या तिसर्या फेरीत ग्रीसच्या चौथ्या मानांकित त्सित्सिपासने फ्रान्सच्या बेनोट पेरीवर 6-3, 7-5, 6-7 (2-7), 6-4 अशी चार सेटमध्ये मात केली. सोमवारी होणार्या उपउपांत्यपूर्व लढतीत त्सित्सिपासची अमेरिकेच्या 20व्या मानांकित टेलर फ्रिट्र्झशी गाठ पडेल.
मिश्र दुहेरीतही बोपण्णा पराभूत
भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याची क्रोएशियन सहकारी डॅरिया जुराक यांना मिश्र दुहेरीतील पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला. आंद्रे गोलूबेव्ह आणि खिचेनॉक यांच्या जोडीने बोपण्णा-जुराक यांना 1-6, 6-4, 11-9 असे पराभूत केले. बोपण्णाच्या पराभवामुळे मिश्र दुहेरीत फक्त सानिया मिर्झा ही एकमेव भारतीय खेळाडू शिल्लक आहे.