अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्हा विक्रम मिनिडोअर संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. २४) पेण आर.टी.ओ. कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलनचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोना काळातील प्रलंबित मागण्या पूढील प्रमाणे आहेत. यामध्ये बदली वाहन आदेशावर BS-VI इको टॅक्सी वाहनास इंधन म्हणून CNG पासिंग करावी. पेण, अलिबाग क्षेत्रातील ६+२ वाहनांना २ वर्ष वयोमर्यादा वाढवून मिळावी. कोरोनामुळे मयत झालेल्या चालक-मालकांना परिवहन विभागाकडून मदत मिळावी.
कोरोना महामारीत ३+१ परवाना धारकांना शासनाकडून रु. १५००/- सानुग्रह अनुदान मिळाले. तेच अनुदान विक्रम, मिनिडोअर, मॅजिक, इको या मिटर टॅक्सी परवानाधारकांना मिळावे; त्यात दुजाभाव नसावा. (P.T.) व्यवसाय करावरील व्याज व चक्रवाढ व्याज न आकारता मुळ व्यवसाय कर आकारला जावा. कोरोना काळात ज्या परवान्याची मुदत संपली आहे व वाहन पासिंग करण्यायोग्यतेचे नाही, असे परवाने नुतनीकरण करतांना व वाहन स्क्रॅप करतांना योग्यता प्रमाणपत्र व विमा प्रमाणपत्राची मागणी न करता वस्तूस्थितीचा निकष लावून परवान्याचे नुतनीकरण करावे.
NIC मार्फत संगणक प्रणालीमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात याव्या. R.T.A. क्षेत्रात रु. ५०००/- शुल्क आहे. मात्र M.M.R.T.A. कार्यक्षेत्रातील टॅक्सी परवाना हस्तांतरण शुल्क रु. २५०००/- आहे, या शुल्कात कपात करावी. ९ मीटर कॅलिब्रेशन सुविधा केंद्र, पेण येथे सुरु करावे, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.