पिकविमा योजनेचा लाभ घ्या- कृषी विभाग

। पनवेल । वार्ताहर ।
खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. पनवेल तालुक्यासाठी भात व नागली पिकांचा यात समावेश असून या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांकडे अवघे सहा दिवस उरले आहेत. शेतकर्‍यांना शेतमालाच्या अनिश्‍चित उत्पन्नाची नुकसान भरपाई सामूहिक स्वरूपात मिळावी, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येते. पनवेल तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी भात पिकाला हेक्टरी 51760 रुपये भरपाई भेटणार असून हेक्टरी 1035 रुपये, तर नाचणी पिकासाठी हेक्टरी 20000 रुपयांसाठी 400 रुपयांचा विमा हप्ता आकारला आहे. या योजनेत शेतकर्‍यांना सहभागी होण्यासाठी 31 जुलैची मुदत देण्यात आली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँक, आपले सरकार सेवा सुविधा केंद्र या ठिकाणी पिक विमा काढण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Exit mobile version