। पनवेल। वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील काल रविवार दि.१८ डिसेंबर रोजी १० ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांच्या निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत तालुक्यातील १० ग्रामपंचायती मधिल एकूण ४७ मतदान केंद्रावर मतदारांनी सकाळ पासूनच उत्स्फूर्तपणे मतदानाला सुरुवात केली होती. एकूणच दिवसभरात सर्वच ग्रामपंचायतींच्या मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांनी गर्दी केली होती व मतदारांचा एकंदरीत चांगला प्रतिसाद दिसून आला. पनवेल तालुक्यात सरासरी ८२.६२ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.