अविनाश जाधव म्हणाले “भाजपाला फक्त दाखवण्यापुरते …”

भाजपा युतीसंबंधी मनसेकडून मोठं विधान

। विदर्भ । वृत्तसंस्था ।

गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि मनसेमध्ये जवळीक वाढताना दिसत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षामध्ये युतीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गणेशोत्सव काळात देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. भाजपा आणि मनसेमध्ये युती होणार का? याबाबत मनसे नेते अविनाश जाधव यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “भाजपाला दाखवण्यापुरते मित्र आहोत. आम्ही त्यांना फारसं महत्व देत नाही”, अस विधान अविनाथ जाधव यांनी केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान जाधव यांनी हे वक्तव्य केलं आहे.

आम्ही अजून कुठेही आमची युती होतेय, असं म्हटलेलं नाही. त्यामुळे आमची भूमिका ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असली पाहिजे. आम्ही सगळ्या जागांवर लढणार आहोत. आमचे सगळ्या पक्षात मित्र आहेत

अविनाश जाधव,  मनसे नेते
Exit mobile version