चिर्ले उड्डाण पूलाला उद्घाटनाची प्रतिक्षा

| उरण | वार्ताहर |

दास्तान फाटा ते चिर्ले रेल्वे क्रॉसिंग वरील उड्डाण पूलाचे काम पुर्णत्वास गेले आहे. त्यामुळे सदर उड्डाण पुलाचा लोकार्पण सोहळा लवकरात लवकर पार पाडावा आणि सदर उड्डाण पूल प्रवाशी वाहतूकीसाठी खुळा करण्यात यावा, अशी मागणी निळकंठ घरत सामाजिक संघटना चिर्लेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

राज्य सरकार, जेएनपीए बंदर, सिडको आणि सार्वजनिक बांधकाम विभागच्या माध्यमातून उरण तालुक्यात विविध ठिकाणी उड्डाण पुलाची उभारणी करण्यात आली आहे. तालुक्यातील दास्तान फाटा ते दिघोडे या रस्त्यावरील जासई-चिर्ले रेल्वे क्रॉसिंगचा त्रास हा सातत्याने दैनंदिन नोकरदार, प्रवासी वाहन चालक यांना सहन करावा लागत असल्याने या रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाण पूलाची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने करण्यात येत होती. त्या मागणीची दखल संबंधित प्रशासनाने घेऊन जे.एम. म्हात्रे कंपनीच्या माध्यमातून दास्तान फाटा ते चिर्ले अशा भव्य दिव्य रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाण पूलाची उभारणी करण्यात आली आहे.

मात्र, सदर उड्डाण पूलाच काम मार्गी लागल्यानंतर ही संबंधित प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आज ही रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाण पूलाचा लोकार्पण सोहळा रेंगाळत पडला आहे. त्यामुळे दैनंदिन नोकरदार, प्रवासी वाहन चालक यांना रेल्वे क्रॉसिंगवर नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी संबंधित प्रशासनाने रहदारीसाठी मार्ग खूला करावा, अशी मागणी निळकंठ घरत यांनी केली आहे.

Exit mobile version