अंकुश जाधवांना पुरस्कार जाहीर

|रोहा | वार्ताहर |

तालुक्यातील साहित्य व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे व कवी म्हणून नावारूपाला आलेले कवी अंकुश जाधव यांना साहित्य सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्था पुणे पुरस्कृत भीमज्योत तरुण मित्र मंडळ आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जाणार आहे. सदर पुरस्कार सोहळा 13 एप्रिल रोजी महाळुंगे इंगळे येथे संपन्न होणार असल्याचे अध्यक्ष विकास राऊत यांनी घोषित केले.

Exit mobile version