ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनाचा पारितोषक समारंभ

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुका पंचायत समिती यांच्या वतीने 2022-23चे 50वे विज्ञान प्रदर्शन ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनामधील विजेत्या स्पर्धकांचा सत्कार 51 व्या विज्ञान प्रदर्शनामध्ये करण्यात आला.

50व्या ऑनलाईन तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये परीक्षक म्हणून सात्विक बोरसे, राजेंद्र सोनवणे, दीपक थोरात आणि सुखदा मेहेंदळे यांनी काम पाहिले. यामध्ये उच्च माध्यमिक विभागात प्रथम क्रमांक मानसी प्रल्हाद शिंदे- एलएईएस, तर दुसरा क्रमांक राजवर्धन सुनील जाधव केईएस शाळा कर्जत, तर तिसरा क्रमांक अथरव रवींद्र राठोड शारदा मंदिर कर्जत, तर आदिवासी विभागात स्वप्नील सुरेश पिरकड मधुरम चॅरिटेबल ट्रस्ट हा विजेता ठरला. माध्यमिक गटात प्रथम क्रमांक पूजा संतोष घरत अभिनव शाळा कर्जत, दुसरा क्रमांक अथर्व संतोष भगत नेरळ विद्या मंदिर तर तिसरा क्रमांक नौतम सुरेश विश्वकर्मा के ई एस शाळा कर्जत आणि आदिवासी गटात विवेक सुधाकर बुरुड पथरज आश्रमशाळा यांनी पटकावला. तर माध्यमिक शिक्षक, परिचर यांच्यासाठी असलेल्या गटात प्राथमिक गटात प्रथम क्रमांक प्रशांत प्रभाकर दळवी, तर माध्यमिक गटात प्रथम क्रमांक संदीप विलास गोसावी गीता इंग्लिश मिडीयम स्कूल यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

या सर्वांचा सत्कार माजी उपसभापती मनोहर थोरवे, गटशिक्षण अधिकारी संतोष डौड, लियाकत सहेद यांच्या हस्ते करण्यात आला.

Exit mobile version