| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण व सत्कार सोहळा कार्यक्रम आ. भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते व माणगाव नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या विशेष उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

यावेळी तालुक्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी नानासाहेब सावंत, रामनारायण मिश्रा, संगीता बक्कम, डॉ. तुषार शेठ, मनोहर मेहता, राकेश शहा, निलेश म्हात्रे, इकबाल हर्णेकर, अ. जलील फिरफिरे, महेंद्र गायकवाड, सचिन देसाई, प्रभाकर मसुरे, संचिता मोरे, महेश शिर्के, प्रा. हर्षल जोशी, निवास साबळे, मारुती चाटे, राकेश मोरे, इम्रान धवलारकार, अभिनंदन दळवी यांना विविध पुरस्काराने, याशिवाय विजयशेठ मेथा, मंगल मेहता, नितीन मेहता, निलेश मेथा, कांतीलाल मेथा, दीपक गायकवाड यांचाही यानिमित्ताने सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन शिक्षक शब्बीर हज्जू व शिक्षिका अपूर्वा जंगम यांनी उत्तमपणे केले. पत्रकार संघाचे अध्यक्ष सलीम शेख, मजिद हाजिते, आजेश नाडकर, प्रा. हर्षल जोशी, प्रा. सतिष बडगुजर, शंकर शिंदे गुरुजी, संगणक तज्ज्ञ भालचंद्र खाडे, कायदेशीर सल्लागार अँड. केदार गांधी, सहसचिव स्वप्ना साळुंके, प्रवक्ता संतोष गायकवाड, सदस्य दिपक दपके तसेच सहकारी व सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले.