। मुंबई । प्रतिनिधी ।
श्री अधिकारी ब्रदर्स एंटरप्रायझेस यांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांतर्गत आठवा गर्व्हनन्स नाऊ डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन या गटात महापारेषण कंपनीला ई-सेवा पुस्तिका विकसित केल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला.
सार्वजनिक क्षेत्रात उत्कृष्ट आणि भरीव कामगिरी करणार्या संस्थांना हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांच्या वतीने महापारेषणचे मुख्य अभियंता शशांक जेवळीकर यांनी दूरदृश्य प्रणालीव्दारे हा पुरस्कार स्वीकारला.महापारेषणच्या ईआरपी आणि आय.टी. विभागाच्या संयुक्त विद्यमाने ई-सेवा पुस्तिका विकसित करून महापारेषणच्या सर्व कर्मचार्यांना ई-सेवा पुस्तिकेची सुविधा एम्प्लॉई पोर्टलव्दारे देण्यात आली आहे. ई-सेवा पुस्तिका विकसित केलेल्या प्रणालीबद्दल वाघमारे यांनी समाधान व्यक्त करून टीममधील सर्व सदस्यांचे कौतुक केले.ई-सेवा पुस्तिका प्रणाली विकसित करण्यासाठी संचालक संजय ताकसांडे, कार्यकारी संचालक सुगत गमरे, सुधीर वानखेडे, राजू गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेंद्र दुर्गे,अनिल कुमार,विजय विटेकर, मनोज जैयस्वाल, संतोष कडलग, भावना कोळी यांनी ही ई-सेवापुस्तिका विकसित केली आहे.