अभिलाष रसाळ यांना पुरस्कार

। रेवदंडा । वार्ताहर ।
सध्या अलिबाग तालुक्यात वावे गावात वास्तव्यास असलेले पंखवाजवादक, उरण तालुक्यातील दिघोडे गावाचे मूळ रहिवासी अभिलाष रसाळ यांना नुकताच राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल कलारत्न पुरस्काराने मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमीच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

मुंबई येथे 17 जुलै रोजी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमीच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.प. श्यामसुंदर महाराज आळंदीकर यांची उपस्थिती होती. तर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सानी पियाराव, शिक्षण तज्ज्ञ हेमांगी जोशी, महापरिषद समन्वयक मनिषा कदम, समारंभाचे मार्गदर्शन श्रीमती गवळी यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

पखवादवादक म्हणून प्रसिद्धीस असलेले अभिलाष रसाळ यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून काका रघुनाथ रसाळ यांच्याकडे पखवाद वादनाचे शिक्षण सुरू केले. पुढे त्यांनी गुरूवर्य सोमनाथ नाईक व गुरूवर्य तालमणी पंडित प्रतापराज पाटील यांच्याकडे पखवाद शिक्षण घेत आहेत. भजन क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरी पाहून त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानाचा फेटा व सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version