| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून साहित्यसंपदातर्फे महिलांच्या हक्कासाठी लढणार्या अलिबाग उपनगराध्यक्ष अॅड. मानसी म्हात्रे यांना समाज संजिवनी पुरस्कार देण्यात आला आहे. महिला सबलीकरण, महिलांसाठी रोजगार निर्मिती आणि समाजातील स्तरांतील महिलांना मार्गदर्शन करून वेळोवेळी त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम म्हात्रे यांनी केले आहे.
आई डे केयर ह्या दिव्यांग (गतिमंद) मुलांसाठी काम करणार्या संस्थेच्या कार्याध्यक्षा स्वाती मोहिते, डॉ. सोनाली वनगे, गीतांजली टेमगि, शीतल चव्हाण-माकर यांना सुद्धा पुरस्कार घोषित झाला आहे.