गडब प्राथमिक आरोग्य केंद्राला पारितोषक

। गडब । वार्ताहर ।

महाराष्ट्र राज्यात सुंदर माझा दवाखाना हा उपक्रम राबविण्यात आला होता या उपक्रमा अंतर्गत पेण तालुक्यातील गडब प्राथमिक आरोग्य केंद्राने उत्कुष्ट काम केल्या बद्दल गडब प्राथमिक आरोग्य केंद्राला सुंदर माझा दवाखाना पारितोषक देण्यात आला.

रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांचे हस्ते गडब प्राथमिक आरोग्य केंद्राला पारितोषक देण्यात आले. यावेळी गडब प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय गागुर्डे, आरोग्य सहाय्यक चंद्रकांत शिर्के, तुकाराम मोकल, शुभदिनी गांवड, कल्पना म्हात्रे, सुनिता पाटील, सागर पाटील आदि कर्मचारी उपस्थित होते. पारितोषक मिळाल्या बद्दल गडब परिसरातील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचार्‍यांचे विशेष अभिनंदन केले.

Exit mobile version