पत्रकार सुनील ठाकूर यांना पुरस्कार

| उरण | वार्ताहर |

पत्रकार सुनील ठाकूर यांची पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाची दखल घेऊन जनरत्न प्रतिभा भूषण पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्थेच्या विशेष सहकार्याने इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन व अमरदीप बालविकास फाऊंडेशन यांच्या वतीने साहित्य मंदिर, वाशी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यप्रतिमा सन्मान महासंमेलनात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सुनील ठाकूर यांनी वृक्षारोपण, आदिवासीवाड्यांवर मास्क व सॅनिटायझरचे वाटप, पत्रकारितेच्या माध्यमातून नागरी समस्यांचे निराकरण, गरजूंना मदत, सहकार्य करणे व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप इत्यादी कार्य केले आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यास नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, श्रीमंत संभाजीराव जाधव, डॉ. अमजद खान पठाण, ॲड. रमेश राठोड, जीएसटीचे उपायुक्त यास्मिन मोलकर, वैजापूरचे तहसीलदार सुनील सावंत, संगीतकार दत्ता कोळी, उद्योजक अश्फाक मन्सुरी व गीता मृच्छला, संयोजक एन.डी. खान व सलमा खान उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल सुनील ठाकूर यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version