| उरण । वार्ताहर ।
आधी तोरण गडाला मग माझ्या घराला या अनुषंघाने सालाबादप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा भौगोलिक व ऐतिहासिक दृष्टया महत्व असलेल्या आवरे येथील मर्दनगड किल्यावर मर्दनगड संवर्धन समिती व रायगड परिवारातर्फे दसर्याच्या निमित्ताने सीमोल्लंघन उत्सव व गडपूजन करण्यात आले. यावेळी मोठया संख्येने उपस्थित राहिलेल्या शिवभक्तांनी प्रथमतः गडाची साफसफाई केली. गडाला तोरण बांधून शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. मर्दनगडाचे गड पूजन केल्यानंतर भगवा ध्वज फडकविण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कौशिक ठाकूर, शंकर पाटील, दिलेश ठाकूर, विजय गावंड, दिपेश ठाकूर, सुजित ठाकूर, तुषार म्हात्रे, मयुरेश पाटील, संजित भोईर, ओंकार गुलप, प्रशांत अत्तिरकर, सुदर्शन घवाळी, नितीन बोडेकर, सुनील दिवे, प्रसाद खैरणार डोंबिवली, कल्पेश भोकरे, अक्षय धुरी, स्वरांग ठाकूर, स्पंदन ठाकूर उपस्थित होते.