सौर ऊर्जेफतील कामगिरीबद्दल महावितरणला पुरस्कार

 मुंबई | प्रतिनिधी |

सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना वेग देण्यासाठी सुरु असलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावितरणसह पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार व पुणे लघु प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष पटनी यांना पुणे झालेल्या ङ्गसूर्याकॉनफ परिषदेमध्ये गौरविण्यात आले.
 सौर ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ व प्रतिनिधींची एकदिवसीय ङ्गसूर्याकॉनफ परिषद पुणे येथे नुकतीच आयोजित करण्यात आली. तीत महाराष्ट्र वार्षिक सौर पुरस्कार-2023चा सोहळा उत्साहात झाला. या परिषदेचे उद्घाटन महावितरणचे प्रादेशिक संचालक   अंकुश नाळे यांच्याहस्ते झाले.  महावितरणच्या विविध उपक्रमांमुळे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या कार्याची दखल घेत ङ्गसूर्याकॉनफ परिषदेमध्ये ङ्गइझ ऑफ डूइंग बिजीनेस फॉर सोलर एजन्सीजफ या श्रेणीत महावितरणला पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच ङ्गलिडरशिप इन पॉलिसी एक्सलेंसफ या श्रेणीत पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार, पुणे लघु प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष पटनी यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Exit mobile version