। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील पुई गावातील समाजसेवक निलेश महाडीक यांना जिजाऊ बहुउद्देशिय सेवाभावी संस्था नागमठाण ता, वैजापूर जि, औरंगबाद येथे आदर्श समाजसेवक छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार देण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिक्षक कैलास प्रजापती, संजय निकम माजी सभापती वैजापूर, मुंबई येथील समाजसेविका श्रमिका दळवी व आयोजक सुर्यकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीपप्रज्वलन करून तसेच मशाल पेटवुन करण्यात आली तसेच या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने झाली. निलेश भाई महाडीक यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अतिशय महत्वाची भूमिका बजावली असून त्यांनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीची दखल घेऊन जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नागमठाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार देण्यात आला.







