पांडुरंग सूर्यवंशी यांना पुरस्कार

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्रांताध्यक्ष अभ्यंकर यांच्या संकल्पनेतून व किशोर जैन संस्थापक अध्यक्ष भारतीय एज्युकेशन विद्यासंकुल यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या मान्यवराचा सत्कार सोहळा रविवारी (दि.10) भारतीय एज्युकेशन विद्यासंकुल वेलशेत येथे आयोजित करण्यात आला होता. सुधागड तालुक्यातील प्राथमिक विभाग संतोष पाटील, रेखा पाटील माध्यमिक विभाग पांडुरंग सूर्यवंशी, रूपाली जाधव, कमलाकर महाबले, विद्या बागुल या शिक्षकवर्गाचा सन्मान कर्तृत्वाचा 2024 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव येथे गेली 32 वर्ष इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे पांडुरंग सूर्यवंशी यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना रायगड यांच्यावतीने सन्मान कर्तृत्वाचा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुरेश खैरे, प्राचार्य संभाजी ढोपे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक वर्ग मित्रपरिवारांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Exit mobile version