| चिरनेर | वार्ताहर |
उरण तालुक्यातील सुदेश म्हात्रे स्पोर्ट्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष विलास म्हात्रे यांना आंतरराष्ट्रीय मानव हक्क सेवा परिषद महाराष्ट्र आदर्श मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा भारतरत्न गौरव श्री पुरस्कार, सुकृत खांडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सुवर्णा करंजे, उपेंद्र सावंत तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. सुदेश म्हात्रे स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक, क्रीडा आणि पर्यावरण आदी क्षेत्रात विलास म्हात्रे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. दरम्यान जीवन गावंड, समिधा म्हात्रे, शुभांगी पाटील, रमाकांत पाटील, रत्नमाला म्हात्रे, अंबरनाथ म्हात्रे, तेजस म्हात्रे, विनोद म्हात्रे, प्रभाकर पाटील, प्रल्हाद म्हात्रे, ए. शी . म्हात्रे, भास्कर म्हात्रे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.