जयपाल पाटील यांची माहिती
। कोर्लई । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील समाज कल्याण व आदिवासी विकास खात्यातर्फे दिल्या जाणार्या पुरस्कारार्थी दि. 9 एप्रिल उजाडले तरी मोफत एसटी प्रवासापासून वंचित राहिले असल्याने संबंधित अधिकार्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी रायगडभूषण प्रा. जयपाल पाटील यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे समाजातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटकांसाठी सेवा करणार्या समाजसेवकास डॉ. बाबासाहेब आंबेडकर, समाजभूषण कर्मवीर दादासाहेब गायकवाड व इतर पुरस्कार सामाजिक न्याय खात्यातर्फे दिले जातात. त्यांना सेवा करण्यासाठी प्रवासाला एसटी महामंडळात साधी, निम आराम, शिवशाहीचा प्रवास राज्यभरात मोफत उपलब्ध असतो. रायगड जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ सहाय्यक आयुक्त नसल्याने जिल्हा समाज कल्याण कार्यालयाकडून पुरस्कारार्थींची यादी पेण येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यालयात न पाठविल्याने एक एप्रिलपासून ओळखपत्र नूतनीकरण करण्यासाठी रामवाडी येथे यासाठी रायगड जिल्ह्याला सहआयुक्त यांनी पूर्णवेळ द्यावा म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्यायमंत्री यांजकडे यापूर्वीच मी मागणी केली होती. अशाच प्रकारे रायगड जिल्ह्यातील आदिवासी सेवकांची यादी रामवाडी एसटी कार्यालयाच्या रस्त्याच्या पलीकडे आदिवासी विकास प्रकल्प अधिकार्यांचे कार्यालय आहे. त्यांनीही 9 तारीख आली, तरी यादी पाठविली नाही. या दोन्ही खात्याच्या सक्षम अधिकार्यांबद्दल शासनाच्या मंत्रालयातील खात्याचे मंत्री व सचिव यांनी याविषयी जरूर विचार करावा, अशी मागणी जयपाल पाटील यांनी केली आहे.