। रसायनी । वार्ताहर ।
रसायनी पोलीस ठाण्याच्या जीवनावश्यक कायदा 3,78 या गुन्ह्यमध्ये दि.9 ऑगस्ट 2012 रोजी टँकर जप्त करण्यात आला होता. येथील सहा टँकर्सचा लिलाव 15 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे.
सदरचे टँकर हे बरेच दिवसांपासून पोलीस ठाण्याच्या आवारात पडून असल्याने ते गंजून जाऊन खराब झाल्याने संबंधित टँकरचे मालकांना नोटीस पाठवून घेऊन जाण्याबाबत कळविण्यात आलेले होते. परंतु, त्यांनी ते आजपावेतो घेऊन गेलेले नसल्याकारणाने सदर मुद्देमाल (टँकरचा) लिलाव करून मिळालेले पैसे शासनजमा होण्याकरिता आदेश होण्याबाबत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पनवेल यांना विनंती करण्यात आली होती. सदर विनंती त्यांनी मान्य केली असून, सदर मुद्देमालाचा (टँकरचा) जाहीर लिलाव करण्याची परवानगी दिलेली आहे. सदरचा जाहीर लिलाव दिनांक 15 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता रसायनी पोलीस ठाणे आवारात आयोजित केलेला आहे. यालिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदविणार्या इच्छुकांनी अनामत रक्कम एक लाख रुपये दि. 14 एप्रिलपर्यंत रसायनी पोलीस ठाण्यात चेकद्वारे जमा करावी, असे रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.