गजानन मुनेश्‍वर यांना पीएचडी प्रदान

। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड वसंतराव नाईक महाविद्यालयात ग्रंथपाल या पदावर कार्यरत असलेले गजानन मुनेश्‍वर यांना ओपीजेएस विद्यापीठ चुरू राजस्थान येथे दिक्षा समारंभात डॉ.जोगेंद्र सिंह यांच्या हस्ते पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी चौधरी ओमप्रकाश, डॉ.जोगेंद्र सिंह, डॉ.राजेश कुमार पाठक, डॉ.उपेंद्र सिंह आदिंसह मान्यवर उपस्थित होते.

मुनेश्‍वर यांनी जिल्ह्यातील कला, वाणिज व विज्ञान महाविद्यालयातील ग्रंथालयाचा 2010-209 मधील झालेला विकास यावर पबंध विद्यापीठस सादर केला व विद्यापीठाने त्यास मान्यता देऊन यांना ही पदवी प्रदान करण्यात आली वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मेहबूब नगरबावडी, उपप्रा. डॉ. विश्‍वास चव्हाण, महाविद्यालयात सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी डॉ.मुनेश्‍वरचे यावेळी अभिनंदन केले.

Exit mobile version