पथनाट्यातून प्रिझमची स्वच्छतेबाबत जनजागृती

। अलिबाग । वार्ताहर ।
दि.01 ते 15 जुलैदरम्यान चालू असलेल्या स्वच्छता पंधरवडानिमित्ताने गेल इंडिया लिमिटेड, उसर यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून गेल इंडिया लिमिटेड, उसर येथे मेरा भारत, स्वच्छ भारत या पथनाट्यातून प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या वतीने स्वच्छता, प्लास्टिक बंदी तसेच कोव्हिड लसीकरण यांसह विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली.

या कार्यक्रमाकरिता गेल इंडिया कंपनी, उसरचे मुख्य महाप्रबंधक व प्रभारी अधिकारी अनुप गुप्ता, मुख्य महाप्रबंधक, नवी दिल्ली एस.सी. रे, महाप्रबंधक वीरेंद्र कुमार, महाप्रबंधक कासिवेलराजन, महाप्रबंधक जितिन सक्सेना, उप महाप्रबंधक अतुल दलाल, मुख्य प्रबंधक एलविना आईजक, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबागच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी तसेच गेल इंडिया लिमिटेड व इंजिनियर्स इंडिया लिमिटेड उसर येथील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच सर्व कॉन्ट्रॅक्टमधील कामगार उपस्थित होते.

या पथनाट्यात विनोद नाईक, विजय शिंदे, सुचित जावरे, प्रसाद अमृते, श्रेया पाटील, मानसी पाटील, पूर्वा नाईक, समृद्धी पाटील आदी कलाकार सहभागी झाले होते. यावेळी सहभागी सर्व कलाकारांचा व प्रिझम संस्थेचा कंपनीच्या वतीने सन्मानही करण्यात आला.

Exit mobile version