आदिवासी बांधवांना मतदानाविषयी जागृती

| माणगाव | प्रतिनिधी |

तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा भुवन आदिवासीवाडी येथे स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृती उपक्रम घेण्यात आला. यावेळी सकाळी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली.

या रॅलीत शंभर टक्के मतदान करण्यासंबंधी घोषणा देण्यात आल्या. पालक, तरुण मंडळाने या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. मतदान जनजागृती होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या चित्रकला, रंगभरण स्पर्धा घेऊन विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. तसेच पालकांकडून मतदान करण्यासंबंधीचे संकल्पपत्र भरुन घेऊन संदेश कार्डही देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश जगताप, उपाध्यक्षा सुनिता वाघमारे, सदस्या पारु जगताप, मुख्याध्यापक हेमंत बारटक्के, उपशिक्षक किशोर तायडे, अंगणवाडी सेविका नेहा शिर्के यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version