पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्यातील धारवली कोरोना नियंत्रण कक्ष आणि स्वदेस फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने श्रीदत्तमंदिर धारवली व ग्रामपंचायत कार्यालय येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण 160 जणांना करण्यात आले.
धारवली सप्तक्रोशी विभागातील लोकांना लस घेता यावी आणि त्यासाठी लांब पोलादपूर येथे न जाता धारवली ग्रामपंचायतीमध्येच लसीकरण मोहीम राबवता येण्यासाठी सरपंच अश्विनी विश्वास सातपुते यांनी विशेष प्रयत्न केले. सदस्य विलास सकपाळ, काळवली सरपंच शांताराम महाडिक, ग्रामसेवक उमेश मनवे व वानखेडे तसेच नोडल अधिकारी प्रदीप पवार, राहुल सोळंकी, पोलीस पाटील रोशन सकपाळ, हर्षल सातपुते, शौकत चाफेकर, मुख्याध्यापक पवार, भिकू कुळे तसेच शेकाप तालुका युवक अध्यक्ष हर्षल सातपुते यांनी पाठपुरावा केला.
यावेळी पळचिल आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेखा बोराडे, आरोग्य सेविका कांबळे, परिचारक शेखर म्हामूणकर, आशासेविका किरण जैतपाल, मनिषा कुळे, स्वदेस फाऊंडेशनच्या हेल्थ को ऑर्डीनेटर डॉ.सुप्रिया सकपाळ, कोऑर्डिनेटर सागर देवे व शरद निविलकर यांचे सहकार्य लाभले. पोलादपूरच्या तहसिलदार दिप्ती देसाई, गटविकास अधिकारी धनंजय जगताप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गुलाबराव सोनावणे यांनी यावेळी लसीकरण शिबिराला भेट देऊन या सप्तक्रोशी परिसरातील ग्रामस्थांसाठी लवकरच लसीकरणाचे शिबीर आयोजित केल्यास अधिकाधिक ग्रामस्थांना कोरोनापासून प्रतिबंधित करणे शक्य होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून अधिकार्यांकडे व्यक्त करण्यात आली.