। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत येथील दिशा केंद्र संचालित रायगड चाईल्ड लाईनने ग्रामीण भागात ज़नजागृती मोहीम राबविली.कर्जत शहराजवळील लाड़ीवली वाड़ी,दहिवली पेट्रोल पंपवाड़ी आणि लाखरण या ठिकाणी चाईल्ड लाईनच्या सदस्यांनी घरोघरी जाऊन जनजागृती केली.
रायगड चाईल्ड लाइनचे कार्यकर्ते यांनी जगदीश दगडे यांचे मार्गदर्शनाखाली ग्रामीण वस्तीमधील नागरिकांना बालकांना कामाला ठेवणे हा गुन्हा असून अडचणीत असलेली लहान मुले यांना सर्व प्रथम मदत करा तसेच चाईल्ड लाईनच्या 1098 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
रायगड चाइल्ड लाइन या प्रकल्पात 18 वयोगटातील मुलांसाठी कार्य करीत आहे. बालकामगार, अनाथ, एकटे आणि आजारी बालके,भरकटलेली बालके,लैंगिक शोषणास बळी पडलेली मुले, शिक्षणापासून वंचित मूल, कौटुंबिक कलहातून सापडलेली मुले अशा मुलांना रायगड चाईल्ड लाईन कडून सहायता केली जाते. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून हा प्रकल्प चालविला जात असून 1098 ही चाइल्ड लाईनची एक 24 तास मोफत आपात्कालीन सहायता करणारी राष्ट्रीय फोन सेवा आहे.