वाहतूक शाखेकडून चालकांचे प्रबोधन

| पनवेल | वार्ताहर |

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत गव्हाण फाटा वाहतूक शाखेकडून चालकांना मद्यप्राशन करून वाहन न चालवणे तसेच, चालत्या वाहनात मोबाईलचा वापर न करणे तसेच अवजड वाहन डाव्या बाजूस चालवण्याबाबत मार्गदर्शन करून प्रबोधन करण्यात आले.

यावेळी नवी मुंबईचे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक श्रीमती गलांडे, पो.ह. पाटील, पो.कॉ. अवताडे आदींनी वाहनचालकांचे प्रबोधन केले.

Exit mobile version