आदिवासीवाडीत विद्यार्थ्यांची जनजागृती

| सोगाव | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कुर्डुस येथील ताडाचीवाडी आदिवासीवाडी येथे गुरुवारी (दि. 8) दी लाईफ फाऊंडेशनद्वारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य विद्यालय, धुळे येथील बी.एस.डब्ल्यू.च्या विद्यार्थ्यांच्या साहाय्याने सामाजिक सुधारणा बाबतीत शिक्षणाचे महत्त्व, व्यसनाचे दुष्परिणाम, स्वच्छ्ता व्यवस्थापन आदी विषयांबाबतीत पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाला धुळे विद्यालयाचे 40 विद्यार्थी व प्राध्यापक प्रा.डॉ.राजेंद्र बैसाणे, प्रा.डॉ.रघुनाथ महाजन, प्रा. आम्रपाली सूर्यवंशी यांच्यासह दी लाईफ फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक शिलानंद इंगळे, प्रणय ओव्हाळ, राखी राणे तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे क्रांती पाटील हे उपस्थित होते.

Exit mobile version