| मुंबई | प्रतिनिधी |
मिरा भाईंदरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन मुलाच्या ताब्यासाठी नवऱ्याने पत्नीवर भररस्त्यात चाकू हल्ला करत तिचा खून केला. ही घटना मिरारोडच्या नयानगरमधील एन.एच.शाळेसमोरील रस्त्यावर घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास नया नगर पोलिस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव अमरीन खान (36) आहे तर आरोपी पतीचे नाव नदीम खान (37) आहे. प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पती पत्नीमध्ये वाद सुरू होते. पती नदीम खान आणि अमरीन खान यांना दोन मुलं आहेत. नदीम यांना दोन मुलांचा ताबा हवा होता. त्यावरुन नवरा बायकोमध्ये वाद सुरू होता. मुलांचा ताबा देण्यास अमरीन यांचा नकार होता. त्याचा राग नदीमच्या मनात होता, त्याच रागातून त्याने पत्नी अणरीन यांच्यावर भर दिवसा चाकू हल्ला करत तिची अस्मिता अनिल इमारती समोरील रस्त्यावर हत्या केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास करीत आहेत.