। चिरनेर । वार्ताहर ।
फिलान हर्बो मेडिक्स प्राव्हेट लिमिटेडच्या वतीने चिरनेर येथे किशोर भगत व प्रगती भगत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीच्या सभागृहात रविवारी (दि.4) आयुर्वेदिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात नाडी परीक्षणाद्वारे डॉ. नजम अली कादरी यांनी आजारांचे निदान करून रुग्णांना मार्गदर्शन केल. संदीप लकडे यांच्या नियोजनाखाली या शिबिराचे व्यवस्थापन करण्यात आले होते. या शिबिरास परिसरातील नागरिक, अबाल वृद्ध, महिला, विद्यार्थी या सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य तपासणी करून घेतली.
विशेषता या आयुर्वेदिक शिबिरात थायरॉईड, मुतखडा, मुळव्याध, मधुमेह, कावीळ, दमा, सर्दी, खोकला, सांधेदुखी, गुडघे दुखी, वातरोग, चर्मरोग, पोट वाढणे, स्त्रियांचे आजार, शौचास साफ न होणे, भूक न लागणे, अपचन, केस गळणे, डोकेदुखी, दंत विकार, अल्सर, गॅस, पित्त, जळजळ, अशक्तपणा, वजन वाढविणे, वजन कमी होणे आदी रोगांची तपासणी हि नाडी परीक्षणाद्वारे करण्यात आली. यावेळी स्त्रियांच्या आरोग्याविषयी माहिती आणि व्यंधत्वाविषयी तपासणी तसेच त्यावरील उपाय योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.