| कर्जत | वार्ताहर |
कर्जत प्रेस क्लबच्या वतीने स्वर्गीय आ. तुकाराम सुर्वे प्रतिष्ठान, दादर- मुंबईतील ज्योविस आयुर्वेद, नारी सामाजिक संस्था दादर-मुंबई यांच्या सहकार्याने भिसेगावामध्ये मोफत आयुर्वेदिक चिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते. या चिकित्सा शिबिरात 281 रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन दत्तात्रेय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात डॉ. राज सातपुते, डॉ. सोनाली घाणेकर, डॉ. उन्नती पित्रोडा, डॉ. प्राची चावडे, डॉ. गायत्री कन्हाडकेकर, डॉ. अश्विनी राठोड, डॉ. सिद्धी लावंगरे, डॉ. हर्षदा राऊत, यांच्यासह पंधरा डॉक्टर आणि दहा आरोग्यसेवकांनी आरोग्य सेवा दिली.
याप्रसंगी याप्रसंगी ज्योवीस आयुर्वेद हॉस्पिटलच्या डॉ. राज सातपुते, डॉ. ज्योती सातपुते, आमदार स्वर्गीय तुकाराम सुर्वे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश सुर्वे, नगरसेवक सोमनाथ ठोंबरे, रायगड प्रेस क्लबचे उपाध्यक्ष संजय मोहिते, पोलीस पाटील संजय हजारे, वसंत ठाकूर, नारी सामाजिक संस्थेचे सचिव विजय सातपुते, राकेश देशमुख डॉ. अदिती गायकवाड, डॉ. आरती घाटे, सोपान गोरे, बिनीता घुमरे, आयेशा वाडकर, महेश क्षीरसागर, किरण पाटील, सोमनाथ ठोंबरे, ज्योती पाटील, वैशाली ठाकरे, वसुधा ठाकूर, दिव्या जोशी, रश्मी भानुशाली, तनिष्क सोलंकी, ज्योती कश्यप, मल्हार पवार, अजय गायकवाड, कांता हाबळे, गणेश पवार, ज्ञानेश्वर बागडे, अनिल गवळे, निशा गुप्ता आदी उपस्थित होते.







