आयुष म्हात्रे होणार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित

| विरार | प्रतिनिधी |

नालासोपाऱ्याच्या नाळे गावातील आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात भारतीय संघाने विश्वविजेतेपद मिळवले. या यशाबद्दल पान मार्केटिंग चॅरिटेबल ट्रस्टतर्फे वसईचे माजी आमदार दिवंगत डॉ. मणिक घोन्सालवीस खेलरत्न पुरस्काराने त्याला सन्मानित केले जाणार आहे. दिवंगत डॉ. मणिक घोन्सालवीस यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त 7 एप्रिलला हा सोहळा होणार आहे. सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहकारी संस्थांना देण्यात येणाऱ्या सहकार महर्षी डॉ. मणिक घोन्सालवीस पुरस्कार वितरण समारंभातच हा खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती पान मार्केटिंग चॅरिटेबल ट्रस्टचे रोहन घोन्सालवीस यांनी दिली आहे.

Exit mobile version