क्रीडा मंत्रालयाकडून घोषणा
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर, जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा थलीट प्रवीण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने गुरुवारी (दि. 2) या क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. 17 जानेवारी 2025 (शुक्रवार) रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवनात एका विशेष समारंभात पुरस्कार विजेत्यांना भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
गुकेश गेल्या महिन्यात वयाच्या 18 व्या वर्षी सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनला होता. हरमनप्रीत सिंगने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व करत सलग दुसरे कांस्यपदक मिळवले, तर पॅरालिम्पिक उंच उडीपटू प्रवीणने 2.08 मीटरच्या विक्रमी उडीसह सुवर्णपदक जिंकले. अर्जुन पुरस्कारासाठी जाहीर करण्यात आलेल्या 32 खेळाडूंच्या यादीत 17 पॅरा अॅथलीट्सचा समावेश आहे. मनू भाकरने ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन ऑलिम्पिक कांस्य पदके जिंकली होती. 10 मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक प्रकारात आणि मिश्र दुहेरीमध्ये ती तिसर्या क्रमांकावर राहिली. तिच्या दोन पदकांच्या जोरावर भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकूण 6 पदके जिंकली.
खेलरत्न पुरस्कार विजेते
1. डी गुकेश (बुद्धिबळ) 2. हरमनप्रीत सिंग (हॉकी) 3. प्रवीण कुमार (पॅरा थलेटिक्स) 4. मनू भाकर (शूटिंग).
अर्जुन पुरस्कार विजेते
1. ज्योती याराजी (थलेटिक्स) 2. अन्नू राणी (थलेटिक्स) 3. नीतू (बॉक्सिंग) 4. स्वीटी (बॉक्सिंग) 5. वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ) 6. सलीमा टेटे (हॉकी) 7. अभिषेक (हॉकी) 8. संजय (हॉकी) 9. जर्मनप्रीत सिंग (हॉकी)10. सुखजित सिंग (हॉकी) 11. राकेश कुमार (पॅरा तिरंदाजी) 12. प्रीती पाल (पॅरा थलेटिक्स) 13. जीवनजी दीप्ती (पॅरा थलेटिक्स) 14. अजित सिंग (पॅरा थलेटिक्स) 15. सचिन सर्जेराव खिलारी (पॅरा थलेटिक्स) 16. धरमबीर (पॅरा थलेटिक्स) 17. प्रणव सुरमा (पॅरा थलेटिक्स) 18. एच होकातो सेमा (पॅरा थलेटिक्स) 19. सिमरन जी (पॅरा थलेटिक्स) 20. नवदीप (पॅरा थलेटिक्स) 21. नितेश कुमार (पॅरा बॅडमिंटन) 22. तुलसीमाथी मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन) 23. नित्य श्री सुमती सिवन (पॅरा बॅडमिंटन) 24. मनीषा रामदास (पॅरा बॅडमिंटन)25. कपिल परमार (पॅरा ज्युदो) 26. मोना अग्रवाल (पॅरा नेमबाजी) 27. रुबिना फ्रान्सिस (पॅरा नेमबाजी) 28. स्वप्नील सुरेश कुसळे (शूटिंग) 29. सरबज्योत सिंग (शूटिंग) 30. अभय सिंग (स्क्वॉश) 31. साजन प्रकाश (पोहणे) 32. अमन (कुस्ती).
अर्जुन पुरस्कार (आजीवन)
1. सुचा सिंग (थलेटिक्स) 2. मुरलीकांत राजाराम पेटकर (पॅरा-स्विमिंग).
द्रोणाचार्य पुरस्कार
1. सुभाष राणा (पॅरा-शूटिंग) 2. दीपाली देशपांडे (शूटिंग) 3. संदीप सांगवान (हॉकी).
द्रोणाचार्य पुरस्कार (आजीवन)
1. एस. मुरलीधरन (बॅडमिंटन) 2. अरमांडो ऍग्नेलो कोलाको (फुटबॉल).
राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार
फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया.
मौलाना अबुल कलाम ट्रॉफी
1. चंदिगड विद्यापीठ (एकूणच विजेते विद्यापीठ) 2. लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (प्रथम उपविजेते विद्यापीठ) 3. गुरु नानक देव विद्यापीठ, अमृतसर (द्वितीय रनर अप विद्यापीठ).