। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील धाकटे शहापूर येथील रहिवासी बाबीबाई राजाराम पाटील (75) या (दि.11) मार्चपासून घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेल्या आहेत. या घटनेबाबत कुटुंबियांनी संपूर्ण परिसरात तसेच नातेवाईकांकडेही तपास केला, मात्र त्या कोठेही सापडल्या नाहीत. शेवटी पोयनाड पोलिस ठाण्यात त्या हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. बाबीबाई पाटील यांच्याबाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी सुनील पाटील 7020619841, चंद्रशेखर पाटील 9158908750, सुषमा पाटील 9867938800 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन कुटुंबियांनी केले आहे.
बाबीबाई पाटील बेपत्ता
