उपाध्यक्षपदी जनार्दन पाटील
| पनवेल । वार्ताहर ।
दि.पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी बाबुराव पालकर तर उपाध्यक्षपदी जनार्दन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पनवेल अर्बन बँकेत आज (सोमवार दि.26 डिसेंबर) निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक बालाजी वाघमारे यांच्या देखरेखीखाली अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. अर्बन बँकेच्या तेरा पैकी तेरा जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला असल्याने महाविकास आघाडीतील नेतेमंडळींच्या सहमताने अध्यक्षपदी शेकापचे बाबुराव पालकर तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे जनार्दन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पनवेल अर्बन बँकेच्या सन 2022 ते 2027 या पंचवार्षिक कार्यकाळात अध्यक्षपदी शेकापचे बाबुराव पालकर, उपाध्यक्षपदी काँग्रेसचे जनार्दन पाटील यांच्यासह संचालक शेकापचे दिलीप कदम, अनिल केणी, राजेश खानावकर, हितेन शहा, बी पी म्हात्रे, पांडुरंग भागिवंत, काँग्रेसचे अरविंद सावळेकर, विमल गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण तर शिवसेनेचे ज्ञानेश्वर बडे व प्रवीण जाधव हे कामकाज पाहणार आहेत.
याप्रसंगी बबन पाटील, शिरीष घरत, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, अभिजीत पाटील, काशिनाथ पाटील, सुदाम पाटील, नारायण घरत, जी आर पाटील, अनंत डी पाटील, मल्लिनाथ गायकवाड, गणेश कडू, हेमराज म्हात्रे, निलेश म्हात्रे, प्रताप गावंड, अरुण ठाकूर यांच्यासह नवनिर्वाचित संचालक मंडळ, महाविकास आघाडीतील नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पनवेल-उरण महाविकास आघाडीने प्रथमच एकत्ररित्या निवडणुक लढवली आणि घवघवीत यश संपादन केले. पनवेल अर्बन बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलने भाजपचा दारूण पराभव केला. या बँकेच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या माध्यमातून उत्तमोत्तम सेवा देण्याचा मानस असेल. तसेच त्या दृष्टिकोनातून नियोजनही देखील केले जाईल. – बबन पाटील, अध्यक्ष – पनवेल उरण महाविकास आघाडी
सातत्याने गेली अनेक वर्षे पनवेल अर्बन बँकेवर शेकापचा वरचष्मा राहिलेला आहे. सोबतीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्हीही पक्ष असून शिवसेनेच्या रूपाने आणखीन एक मित्र अर्बन बँकेला मिळाला. मागील वेळेप्रमाणे यावेळी देखील 13-0 याप्रमाणे भाजपचा पराभव केला. महाविकास आघाडीच्या वतीने बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन. – जे एम म्हात्रे, माजी नगराध्यक्ष
