बच्चू कडूंचा सरकारला अल्टिमेटम

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

अन्नत्याग आंदोलन सातव्या दिवशी मागे

| अमरावती | प्रतिनिधी |

शेतकरी, दिव्यांग आणि विधवा महिलांच्या प्रश्नांसाठी ‌‘प्रहार’ संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अमरावतीत अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन सातव्या दिवशी मागे घेण्यात आले आहे. सरकारने आपल्या मागण्या विचारात घेतल्याचे सांगत बच्चू कडू यांनी आंदोलन तूर्तास मागे घेत असल्याचे म्हटले. तसेच, मागण्या मान्य झाल्या नाही तर 2 ऑक्टोबरपासून पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत होता. शनिवारी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणावेळीही प्रहारच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत कर्जमाफी देण्याच्या घोषणा दिल्या. त्यानंतर मंत्री उदय सामंत आणि दादा भूसे यांनी बच्चू कडू यांची भेट घेत सरकारने मागण्यांची दखल घेतल्याचे म्हटले. यावेळी बच्चू कडू यांनी आपले आंदोलन तूर्तास माग घेत सरकारला 2 ऑक्टोबर पर्यंतचा अल्टिमेटम दिला. अन्यथा उदय सामंत यांच्या घराबाहेर आंदोलन करू असाही इशारा दिला.

Exit mobile version